मऱ्हाटीचिये नगरी

Tuesday, February 7, 2017

सैरंध्री - Sairandhri

 मराठी सिनेमा सैरंध्री आजच्या दिवशी, सन १९३३ साली प्रदर्शित झाला होता.
'भारताचा सर्वोत्तम अमूल्य ठेवा' म्हणून या सिनेमाची नोंद आहे.





प्रभात फिल्म कंपनीची निर्मिती असलेला , व्ही शांताराम यांचे दिग्दर्शन, मास्टर विनायक अभिनेते, गोविंदराव टेंबे यांचे संगीत, लीला निंबाळकर अभिनेत्री अशा दिग्गजांचे योगदान या सिनेमाला लाभले.


महाभारताच्या एका ऐतिहासिक घटनेवर आधारित असेलला 'सैरंध्री' सिनेमा मराठीसोबतच हिंदी भाषेमध्ये ही प्रदर्शित झाला होता.


सैरंध्री सिनेमाची भारतातला पहिला वहिला रंगीत सिनेमा म्हणून नोंद आहे. या सिनेमाचे चित्रीकरण पूर्णपणे भारतात झाले असल्याने पुढे प्रकियेसाठी सिनेमाचे रीळ जर्मनीला पाठविण्यात आले होते. जर्मनीमध्ये या सिनेमांच्या रीळवर प्रक्रिया पूर्णपणे यशस्वीरित्या झाली नसल्याने प्रेक्षकांची नाराजी या सिनेमाला पत्करावी लागली.  आठवडाभर यथा तथाच असा प्रेक्षकांचा प्रतिसाद या सिनेमाला लाभला.

सैरंध्री


भारताचा अमूल्य ठेवा म्हणून सैरंध्रीच्या रूपाने ७या सिनेमासाठी अखंड परिश्रम घेणाऱ्या प्रत्येक कलाकाराला मानाचा मुजरा .


 
Lovingly designed by Tasnim